मुंबई- छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत जेठालाल गडाची भूमिका साकारणार्या दिलीप जोशी यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे.
दिलीप जोशी यांच्या घरी लवकर सनई-चौघडा वाजणार आहे. निमित्त आहे त्यांची मुलगी नियती हिचे लग्न. नियती हिचे यशोवर्धन याच्याशी विवाह होणार असून लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे.
दिलीप जोशी यांची मुलगी नियती हिचे लग्न ठरले असून नुकतात त्यांच्या घरी संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात दिलीप जोशी यांचा फुलऑन स्वॅग दिसला. जोशी यांनी ढोल-ताशांच्या तालावर जबरदस्त डान्स केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलीच्या संगीत सोहळ्यात दिलीप जोशी यांनी निळा कुर्ता घातला होता. जोशी यांच्या चेहर्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. संगीत सोगळ्यात गरबा आणि दांडिया यांचीही धूम पहायला मिळाली. या सोहळ्यात जोशी यांनी फुल्ल जोशात डान्स केला. ढोल-ताशांच्या तालावर डान्स करण्यासोबत त्यांनी एक गाणेही म्हटले.
नियती ही दिलीप जोशी यांची मोठी मुलगी आहे. तिचे लग्न आणि रिसेप्शन मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे. या लग्नात तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची संपूर्ण टीमही दिसण्याची शक्यता आहे. मात्र सर्वांचे लक्ष दयाबेन उर्फ दिशा वकानी हिच्यावर असणार असून ती लग्ना येणार की नाही हे गुलदस्त्यात आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या