मुंबई : तुझी चिमणी उडाली भूर माझा पोपट पिसाटला, या गाण्याने अक्षरश: प्रत्येकाला ठेका धरायला भाग पाडले होते. आजदेखील डीजेवर हे गाणं वाजलं की, एकचं ताल धरला जातो.
तुम्हाला माहितीये का, ठसकेबाज मराठमोळं गाणं एका अमराठी अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आले होते. ती अभिनेत्री आहे गुरलीन चोप्रा. गुरलीन चोप्रा हिला एका कार्यक्रमात जेव्हा या गाण्याचा अर्थ माहितीये का, असं विचारण्यात आले, तेव्हा सर्वांमध्ये एकचं हसू पिकले होते. तिला या गाण्याचा अर्थ माहित नव्हता. पण, तिने गाण्यात एक्सप्रेशन्स मात्र जबरदस्त दिले होते.
तुम्हाला माहितीये का, गुरलीनचा तुझी चिमणी उडाली भूर गाण्यात मराठमोळा अंदाज दिसला होता. गुरलीन चोप्राचा जन्म चंडीगढमध्ये झाला. शिक्षण झाल्यानंतर ती मॉडलिंगमध्ये गेली. मॉडलिंगमध्ये तिने आपले लक्ष केंद्रित केले. तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगढमध्ये पूर्ण झाले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या