अनेक महिलांमध्ये उपजत कला-गुण आढळतात. अनेक महिलांना चित्रकला, हस्तकला, मूर्तीकला आवडते. डिझायनिंग, अँनिमेशन, गेमिंगमध्येही त्यांना रस असतो. पण या छंदांना, कलागुणांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून वाव देता येतो. हे अभ्यासक्रम पूर्ण करून छंद, आवडींना व्यवसायाची जोड देऊ शकता.
चित्रकला, हस्तकला, डिझायनिंगसारख्या कलांना फाईन आर्टस म्हटलं जातं. यात बॅचलर, मास्टर्स किंवा पीएचडी करता येते. सोबत वर्षभराचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
बॅचलर इन फाईन आर्टस साठी चार वषर्ं द्यावी लागतात. दोन वर्षाचा मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फाईन आर्टसमध्ये पीएचडी करता येते. दूरस्थ शिक्षण पद्धतीनेही फाईन आर्टची पदवी मिळवता येते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक संधी प्राप्त होतात. इतर क्षेत्रांमध्ये नोकरी करणार्या महिला फ्री लान्सर म्हणून काम करू शकतात.
0 टिप्पण्या