मुख्यपृष्ठ Poem एड्स एक डायनासोर...
एड्स एक डायनासोर...
दि.०१ डिसेंबर ,२०२१ ला असलेल्या "जागतिक एड्स दिना"निमित्त कवी प्रा.अरुण बा.बुंदेले यांचे "एड्स एक डायनासोर" हे काव्यगीत वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.-संपादक
डायनासोर अाला भारती डायनासोर आला रे ॥
एड्स नाव तयाचे मानवा नष्ट करतो रे॥धृ॥
होतो हा एच.आय.व्ही.विषाणुपासुनी।
शिरतात शरीरात माणसाच्या रक्तामधुनी।
रक्तातील श्वेतपेशीवर करिती त्या हल्ला रे ॥१॥
पांढऱ्या पेशी रक्तातील नाहिशा होता।
घटे माणसाची रोग प्रतिकार क्षमता ।
तुटुन पडती रोगजंतू शरीरावरती रे॥२॥
ताप-खोकला-कमजोरी एड्सने येई।
व्यक्तीच्या वजनाला घटण्याचीच घाई ।
डायरिया-त्वचारोग ही लक्षणे तयाची रे॥३॥
दुषित सुया नि रक्तामुळे एड्स रोग होतो।
समलिंगी संबध नि वेश्यागमनाने होतो।
असे करूनी करु नका प्रसार तयाचा रे॥४॥
मातेपासूनी बाळाला एड्स रोग होतो।
गुन्हेगार दुसरेच बाळ बळी पडतो।
तान्हे बाळ होत असे भक्ष्य तयाचे रे॥५॥
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
(Images Credit :Patrica)
0 टिप्पण्या