Recent in Technology

Advertisement

Breaking News

राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

    114 रक्तदात्यांनी केले रक्तदान

    भिवापूर : स्थानिक भिवापूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने द्वारा आयोजित बॅकवर्ड क्लास युथ रिलीफ कमिटी, नागपूर या संस्थेचे सचिव तथा माजी राज्यमंत्री माननीय श्री राजेंद्र जी मुळक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

    महाविद्यालयाच्या भव्य इनडोअर स्टेडियम मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोबी जॉर्ज यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता माननीय दिलीप जी गुप्ता, माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष राहुल गुप्ता, जीवन ज्योती रक्तपेढीचे डॉक्टर अनिल नामपल्ली वार, श्री किशोर खोबरागडे आणि त्याचे सर्व सहकारी, महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

.

    महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे तालुक्यात उल्लेखनीय कार्य असून ही सामाजिक दायित्व जपणारी संस्था म्हणून तालुक्यात लोकांच्या विश्वासास व अभिनंदनास पात्र ठरली covid-19 च्या संक्रमण काळात दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्या दोन्ही शिबिरात एकूण 139 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. तर संस्थेचे सचिव माजी राज्यमंत्री माननीय राजेंद्रजी मुळक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनांक 8 डिसेंबर 2021 या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 114 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये देवापुर तालुक्या सोबतच पवनी, चिमूर व उमरेड तालुक्यातील रक्तदाते प्रामुख्याने पोलीस कर्मचारी, कृषी कर्मचारी, 2001 पासून ते 2021 पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना मध्ये उल्लेखनीय कार्य केलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी एनसीसी विद्यार्थी, रासेयो पथकातील विद्यार्थी, भिवापूर शहरातील व परिसराच्या गावातील सामाजिक संस्थेतील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व पत्रकार यांचा समावेश होता.

    महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या माध्यमातून कोरणा संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व लसीकरणासाठी भिवापूर तालुक्यातील गावांमध्ये तहसील ऑफिस च्या सहकार्याने पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यासोबतच स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन, एड्स जनजागरण, वाहतूक सुरक्षा अभियान, आरोग्य शिबिर आधी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून केले जाते.

    राष्ट्रीय सेवा योजनेच्या रक्तदान शिबिराला रासेयोच्या सहसमन्वयक डॉक्टर अश्विनी कडू, डॉक्टर योगेश मोरे, डॉक्टर आदित्य सारवे, डॉक्टर अनिता महावादीवार , डॉक्टर राजेश बहुरूपी, डॉक्टर मधुकर नंदनवार, डॉक्टर सोमेश्वर वासेकर, डॉक्टर विजय दिघोरे, प्राध्यापक कुमारी चेतना ठाकरे, प्राध्यापक अमित ठाकरे, प्राध्यापक रविकांत मिश्रा, प्राध्यापक सचिन कुबडे तसेच कर्मचारी श्री संजय मेश्राम, गुलाब गेडेकर, आदींनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला. या शिबिराला जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर त्यांच्या चमूचे सहकार्य लाभले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक डॉक्टर मोतीराज चव्हाण रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक यांच्या मार्गदर्शनात कु. ईशा मामीडवार, हिमांशू दुपारे, सावन सोनवणे, पूजा वाणी, शबाना कुरेशी, समीर शेळके, नयन हरणे, प्राची मानकर व कृष्णा महाजन यांच्या गटाने प्रयत्न केले. असेप्रसिद्धीप्रमुख डॉ. मोतीराज चव्हाण रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक, भिवापुर महाविद्यालय, भिवापुर जिल्हा नागपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्रारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code