अमरावती : येथील फुले - आंबेडकर प्रबोधन मंच तर्फे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधाना मधून प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करून व्यक्तिगत स्वातंत्र्य बहाल केले असल्याचे प्रतिपादन प्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी ऍड. प्रभाकर वानखडे यांनी प्रबोधन मंचच्या नि:स्पृह समाज सेवेची व सत्यशोधकीय कार्याची प्रशंसा केली.सामाजिक जाणीवेचे कवी व लेखक प्रा. अरुण बुंदीले यांनी वंदन गित गाऊन बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी सुधाकर वीरूळकर,कामगार नेते श्रीकृष्ण माहोरे, रामलाल खैरे, सुभाष शिंदे, माणिक लोखंडे, निलेश मसकर आदी फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.
0 टिप्पण्या