मुंबई : गेल्या वर्षभरापासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते त्याला न्याय मिळवूण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात बर्याचवेळा सुशांतची बहिण श्वेता कीर्ती सिंग सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करताना दिसते. दरम्यान, श्वेताने असा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा फोटो शेअर केला आहे. नेहमी सुशांतसाठी पोस्ट शेअर करणार्या श्वेताने आता तिचा फोटो शेअर केला आहे. श्वेताने तिचा बीचवरचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्वेताने मरून रंगाचे ब्रालेट परिधान केले आहे. श्वेताचा हा बोल्ड फोटो पाहिल्यनंतर नेटकर्यांनी राग व्यक्त केला आहे.
काही नेटकर्यांनी श्वेताला सुशांतची आठवण करून दिली आहे. तर काही नेटकर्यांनी श्वेताला असे फोटो शेअर न करता सुशांतच्या केसवर लक्ष देण्यास सांगितले आहे. दरम्यान, या आधी श्वेता अंकिताला लग्नासाठी शुभेच्छा दिल्यामुळे चर्चेत आली होती.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या