गझल मंथन समुहाच्या सतत गझल कार्यशाळा घेणाऱ्या, ज्या सध्या त्यांच्या १९ व्या कार्यशाळेत गझलकार व गझलकारा तयार करत आहेत, त्या आदरणीय गुरूवर्या, आमच्या आ. माई, म्हणजेच उर्मिला बांदिवडेकर ह्या होय. त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला गझल संगह उर्मिला गझल संग्रहाविषयी लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे.
'उर्मिला' हा आ.माईंचा पहिला वहिला गझल संग्रह. उर्मिला नावाप्रमाणेच त्यांचा त्याग, निःस्वार्थी साहित्याची सेवा, तसेच ह्या वयात ही तरुणाईला लाजवेल असा गझल शिकवण्याचा गोडवा व उत्साह बघून तोंडात बोटे घालावी लागतात. "गझलकार/गझलकारा घडवणे हा त्यांचा गुण, आणि 'गझल मंथन' हा एक मोठा परिवार. "गझल मंथन हा वृक्षच मुळात माईंच्या रुपानं अनेकांचा आधारवड ठरलाय", असे त्यांच्याच कार्यशाळेत घडलेले गझलकार विष्णू जोंधळेसर म्हणतात, ते अगदी खरेच आहे.
माईच्या उर्मिला गझल संग्रहात एकूण एकशे एक गझला विविध रंग, ढंग, कला कौशल्याने माईंनी सुशोभित करून लिहिलेल्या आहेत.सुरुवातीलाच माईंची देवप्रिया वृत्तातली मतलाबंद गझल आहे.त्यातला हा शेर बघा:-
आईविना पोरक्या असलेल्या तान्हुल्याचा सांभाळ करणारा बाप त्याच बरोबर स्वतःचे पत्नी वियोगाचे दुःख लपवून वावरणाऱ्या बापाचे वर्णन अत्यंत करुणामय ह्या शेरात आहे.
ही माईंची गझल म्हणजे स्त्री मनाच्या सुख दुःखाची व्यथाच कथीत करते. संसारात वावरत असताना प्रत्येक स्त्री हे अनुभवतच असते.माझ्या मनातलंच माईंनी कसं जाणलं असं वाटतं. त्यातला शेवटचा शेर बघा:-
अशा एकापेक्षा एक सरस अशा गझलांचा खजिना म्हणजे उर्मिला मराठी गझल संग्रह. या संग्रहात ३२ अक्षर गण वृत्तातल्या व आठ मात्रा वृत्तातल्या गझला आहेत. एकूण आ. माईंनी चाळीस वृत्ते हाताळलेली आहेत. प्रत्येक गझलेचे शीर्षक, त्याची लगावली व मात्रा लिहिल्यात, त्यामुळे नवोदितांना अभ्यासाला खूपच उपयुक्त आहेत.नवोदितांनी हा संग्रह जवळ बाळगावाच.
त्यांच्या गझला ह्या पाच, सात व नऊ शेरांच्या असून वेगवेगळे भाव प्रगट करतात. माई एक गृहिणी, त्यातून संसारिक व जगाचा अनुभव घेतलेली मध्यम वर्गीय स्त्री असल्या कारणाने गझलेत वेगवेगळे अर्थ घेण्यासाखे शेर सामावलेले आहेत. प्रत्येक गझलेतला शेर हा सहज, साध्या, सोप्या भाषेत गुंफलेला आहे आणि त्यामुळेच तो वाचकांच्या मनातलाच आहे असे वाटते. आ. माईचा गझल संग्रह अप्रतिमच आहे. त्यातल्या माझ्या मनाला खूपच भावलेल्या गझला तर काही गझलेतले अप्रतिम शेर मी खाली नमूद करू इच्छिते. त्या खालील प्रमाणे...
१) कुणाशी घ्यायचा पंगा बघू या वेळ आल्यावर ही वियदगंगा वृत्तातली गझल अतिशय उत्साहवर्दक प्रेरणा देणारी. अति झालं की माणसाची सहनशीलता शांत राहत नाही व वेळ येताच पंगा घेण्याच्या तयारीत असते.
२) जीर्णशीर्ण झालेले छळते पुस्तकातले पिंपळपान पादाकुलक +मुरजयी वृत्तातल्या या गझलेत शालेय जीवनातल्या गोड आठवणी पुस्तकात आपण जपून ठेवतो. ते कोवळं प्रेम पुढील जीवनात नसलं तरी त्याच्या आठवणी पुस्तकातले पिंपळपान स्मरायला भाग पाडत असतं.
३) लेक असते कृपाळू भुईसारखी
पान ९९ स्त्रग्विणी वृत्तातली गझल ही मुलीच्या स्वभावाचे वेगवेगळे सुखकारक आणि वास्तविक गुणाचे वर्णन आ. माईनी अतिशय सुंदर शेरात मांडलयं.
४) आयुष्याच्या वळणावरती भेटतात दिलदार माणसे
पान ३६ वनहरिणी मात्रा वृतातल्या गझलेत माईनी माणसांच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती बद्दल लिहिलंय. अशी माणसे आपल्या जीवनात भेटतात काही दिलदार तर बेदरकार ह्याची टोपी त्याला करणाऱ्या, मुग्ध कळ्यांना कुस्करणाऱ्या काळा पैसा उधळणारी बेजार माणसे!! गझल संग्रहातले मला खूपच आवडलेले शेर बघा:-
कधी कधी अशी दुःखद किंवा त्रासदायक घटना घडल्याने संपूर्ण घराला अवकळा येते. सगळे निराशावादी असतात तेव्हा हा सगळा ताण दूर होतो व चेहऱ्यावर आनंदाच्या उकळ्या आणणारे ते एकमेव गोंडस, द्वाड मुलच असते.
आ. माईंच्या सगळ्याच गझला अशा विविध ढंगाच्या शेरांनी भरलेल्या आहेत. आ. माईंचं लेखन कौशल्य जाणून घ्यायचं असेल तर उर्मिला गझल संग्रह नीट वाचावाच लागेल. जरूर विकत घ्या आणि संग्रही ठेवून अभ्यासून घ्या.
मी आ. माईंच्या आशीर्वादानेच माझा गझल प्रवास चालू ठेवणार. उर्मिला हा गझल संग्रह पोस्टेजसह 210 रूपयात उपलब्ध आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी काशीनाथ गवळी यांच्याशी 985044187या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या