- * शेघाट येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाकरीता १६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता !
- * आ. देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे शेघाट ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन !
वरुड : मोर्शी विधानसभा मतदार संघातील शेघाट येथे प्राथमीक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून नवीन इमारतीस मान्यता प्रदान करण्याबाबात मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून प्राधान्याने निधीची तरतूद करून देण्याची मागणी केली होती.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शेघाट परिसरातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी शेघाट येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेऊन त्यास राज्य शासनाने "विशेष बाब' म्हणून मान्यता मिळाली व तीन महिन्यांच्या कालावधीमध्येच इमारत बांधकामाकरिता शेंदूरजना घाट येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून नवीन इमारत बांधकामाकरीता १६.०५ कोटी रुपायांच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
यामध्ये शेंदूरजना घाट येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासह (तळ मजला ३३१९.२० चौ.मी.) फ्युल गॅस पाईपलाईन, बायो डायझेस्टर, रेन वॉटर हावेस्टिंग, सौर छप्पर, फर्निचर, विदयुतीकरण, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, आग प्रतिबंधक, व लिफ्ट इ. साठी तरतूद करण्यात आली आहे.
वरुड मोर्शी तालुक्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी आमदार देवेंद्र भुयार प्रयत्न करतांना दिसत आहे. शेंदुरजना घाट येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे नवीन ग्रामीण रुग्णालय स्थापण करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होऊन १६.०५ कोटी रुपयांची तरतूद करून दिल्यामुळे शेंदूरजना घाट परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पुरविण्याचे दृष्टीने पाहीजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबतची पुर्व तयारी असणे काळाची गरज निर्माण झालेली आहे. सद्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची सोय फक्त प्राथमीक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणा-या उपकेंद्रावर अवलंबुन असल्यामुळे ग्रामीन भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
0 टिप्पण्या