जळतानाही माझा सांगूनी भीम गेला,
ढाळु नका आसवं बोलून भीम गेला |
हा ज्ञानाचा रथ मी, येथवर आणला,
ओढू नका मागे तेथेच ठेवा त्याला ||
मंगळवार दिनांक ४ डिसेंबर१९५६*•••••
मंगळवार दिनांक 4 डिसेंबर 1956 सकाळी नानकचंद रत्तू यांनी टाईप केलेल्या कागदपत्रांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या सह्या घेतल्या आणि पोस्टामध्ये टाकण्यासाठी ते निघून गेले.
बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी *जैन व बौद्ध धर्मातील तत्वांची सम व विषम स्थळे यावर त्यांच्याशी चर्चा केली. याबाबतीत जास्त विचारविनिमय करावा व दोन्ही धर्मातील लोकांचा मिलाफ करावा, यासाठी योजना आखावी* अशी त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली.
बाबासाहेब म्हणाले यासंबंधी आपण उद्या रात्री ८:३० च्या नंतर जास्त चर्चा करू,जैन मंडळी उद्या रात्री चर्चा साठी येतो असे सांगून गेली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी राज्यसभेमध्ये गेले. राज्यसभेच्या कामकाजात ते उत्साहाने सहभागी झाले. राज्य सभेचे काम संपवून ते आपल्या बंगल्यावर परतले. त्यांनी काही पत्रे लिहिली होती त्यात एक पत्र आचार्य. प्र. के. अत्रे आणि दुसरे पत्र एस. एम. जोशी यांना लिहिले होते. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी *रिपब्लिकन पक्षाचे ध्येय, धोरण, कार्यक्रम वगैरे मुद्दांसंबधी माहिती देणारा १०-१२ पानांचा इंग्रजी मजकूर लिहिला*. ब्रह्मदेशाच्या सरकारने भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी साहाय्य करावे अशा अर्थाचे त्या सरकारास पत्र लिहून सर्व लिखाण बाबासाहेबांनी तयार करून ठेवली व नानकचंद रत्तू पोस्टातून आल्यावर ते पत्र टाईप करण्यासाठी त्याच्या कडे सोपविले आणि टाईप झाल्यावर मला दाखवून तु घरी जा असे सांगितले अर्थात 4 डिसेंबरचा दिवस आनंदात उत्साहात गेला.
[संदर्भ: डाॅ भीमराव रामजी आंबेडकर खंड १२]
नानकचंद रत्तू जी अनुभव आणि आठवणीत सांगतात की
मी टाईप केलेले कागदपत्रे बाबासाहेबांना दाखविण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. बाबासाहेबांचे डोळे बंद करून कदाचित चिंतन करीत असावेत. बाबासाहेबांचा निस्तेज चेहरा पाहून कालचा प्रसंग आठवला. माझ्या डोळ्याचे पाणी बाबासाहेबांचे पाय भिजवित होते. बाबासाहेबांनी हलकेच डोळे उघडून मी रडत आहे हे पाहिले. त्यांनी मला बसायला सांगितले. मी बाबासाहेबांच्या पाया जवळ बसलो आणि बाबासाहेब मला म्हणाले कि तु आपल्या लोकांना जाऊन सांग...
माझं जर बरं वाईट झालं तर*.....
"हे आयुष्य आज न उद्या संपणारच आहे"
थोडे थांबून डोळ्यातली आसवे पुसून आणि हात लकाकत्या डोळ्यांच्या किंचित वर ठेवून ते म्हणाले........
"नानक तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे."
"ते करतांना पिळवटून टाकणार्या संकटाचा आणि अंनत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला."
"जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला.* *माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी धोका दिला. त्यांच्याशीही मी दोन हात केले."
"मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशाची आणि सोषित-पिडितांची सेवा करीतच राहीन."
"हा रथ आज जेथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खूप सायस पडले."
हा रथ असाच त्यांनी पुढे आणि आणखी पुढे चालू ढेवावा."
"वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, वाटचाल सुरूच ठेवावी."
"त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्व जीवन जगायचे इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे."
"जर माझे लोक, माझे सहकारी हा रथ पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे."
"कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या रथास परत फिरू देऊ नये."
"हा माझा संदेश आहे. बहुधा शेवटचा संदेश आहे."
"मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते."
असे तीनदा पुन्हा पुन्हा तेच वाक्य पुटपुटत होते...
असे बोलून होताच त्यांना हुंदके फुटले, अश्रू त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा ओघळू लागले
निराशेच्या गर्तेत ते खोल बुडाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर असह्य वेदना आणि तीक्ष्ण यातना स्पष्ट दिसत होत्या.
[डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी - नानक चंद रत्तू-]
0 टिप्पण्या