अमरावती : नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व अनुचित प्रकार टाळण्यासाठी दि. 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजतापासून दि. 1 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील काही उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय शहर पोलीसांनी घेतला आहे.
याबाबत जारी तात्पुरत्या अधिसूचनेनुसार, या कालावधीत गाडगेबाबा समाधी ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडियमकडे येणारा उड्डाणपूल, त्याचप्रमाणे इर्विन चौक ते राजापेठ पोलीस ठाणे, कुथे रूग्णालय ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे उड्डाणपूलावरून ये- जा करण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अमरावती शहर मुख्यालयाचे प्रभारी पोलीस उपायुक्त लक्ष्मण डुंबरे यांनी ही तात्पुरती अधिसूचना जारी केली.
- (छाया : संग्रहित)
0 टिप्पण्या