Header Ads Widget

लेखनी परजून ठेवा..!

    लेखनी परजून ठेवा
    हल्ले सुमार होते आहे
    शब्दार्थ शोधून ठेवा
    अर्थ रोज बदलते आहे
    नसली खरी जरी पदवी
    राजमान्य वकील आहे
    खटले असले खोटे जरी
    निकाल जनमान्य होत आहे
    टी.व्ही. असू देत त्यांचा
    रिमोट तुम्हाकडेच आहे
    चँनल बदलवून टाका
    बातमी तुमचीच आहे
    कटाक्ष असू द्या अनितीवर
    निती रोज गर्भार होत आहे
    लक्ष असू द्या पानापानावर
    ज्यावर हक्क गोंदले आहे
    भासती घरातले तुमच्या
    तरी मनसुबे नेक नाही
    विश्वासूनी राहू नका रे
    नगदी वठणारा चेक नाही
    चंद दलालींवर आज
    माणुसकी लिलाव होते
    माना डोलविणारे बैल
    दावणीला बांधले जाते
    जागे राहून जागल करा
    प्रत्येक रात्र दोगली आहे
    इमान राखा सर्जकाशी
    व्यथा त्यानेही भोगली आहे
    -अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या