Recent in Technology

Advertisement

Breaking News

सरकारी शाळांच्या पटसंख्येत वाढ

    कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे गेले दीड वर्ष शाळा ऑनलाईन सुरू होत्या. मात्र, ऑनलाईन शिक्षण समजून घेताना विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. त्यातच काही शाळांनी फी शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला. परिणामी, बहुतांश पालकांनी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांत पाल्यांचे प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील सरकारी मराठी शाळांमध्ये सात हजार विद्यार्थी वाढले आहेत.

    गेल्या काही वर्षांत मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा यासाठी पालकांचा आग्रह असे. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिका शाळांमधील पटसंख्या कमी झाली होती. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांचे रोजगार बुडाले, अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे शाळांची फी भरणे पालकांना आवाक्याबाहेर गेले आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही मुलांना ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित समजत नसल्याने त्यांचे नुकसान झाले. मराठी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता वाढल्याने पालकांचा पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे ओढा वाढला आहे.

    ग्रामीणसह शहरात १ ली ते ८ वीपयर्ंतच्या सुमारे २६४८ शाळा आहेत. गेल्या वर्षी १ लाख ६५ हजार ९१४ पटसंख्या होती. यंदा ती १ लाख ७३ हजार ३२ झाली आहे. यात ७ हजार ११८ ने वाढ झाली आहे.

    महापालिकेच्या पहिली ते आठवीपयर्ंतच्या ५९9 शाळांत १0 हजार २00 विद्यार्थी आहेत. यावर्षी महापालिका शाळांमध्ये नव्याने ४00 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशित विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये कायम टिकविण्यासाठी मनुष्यबळ व व्यवस्थापन, प्रशासन यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. पालकांच्या विश्‍वासास पात्र ठरल्या तरच सरकारी शाळांचे भविष्यात चित्र नक्की बदलेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code