Recent in Technology

Advertisement

Breaking News

विदर्भ व मराठवाड्यात गारपीट

    नागपूर : मध्य भारताच्या काही पट्टामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालामुळे विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी गारपीट झाली. गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, जालना, जळगा या जिल्हय़ात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पिकांची हानी होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतित झाले आहेत.

    मराठवाड्यात पुढील काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्य़ातील अनेक भागात पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळाले. तर वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव या ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली.औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार, गोळेगाव, शिवना येथे रिमझिम पाऊस बरसत होता तर, वैजापूरच्या चेडुफळ येथे गारांचा पाऊस पडला आहे. तसेच जिल्हाभरात ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    मध्य भारताच्या काही पट्टामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालामुळे काही भागात गारांसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार,२८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्हय़ात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्हय़ात थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्य़ांत शेतकर्‍यांना धडकी भरली गेली आहे. हल्ली जिल्हय़ात शेतकर्‍यांची धान कापून शेतात ठेवलेला आहे. हय़ा पावसामुळे भंडारा जिल्हय़ातील शेतात कापून ठेवलेला आणि उघड्यावर असलेला धान पिकाला नुकसान होण्याची शक्यता तर आहेच. सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथीचे रोग डोके वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code