Recent in Technology

Advertisement

Breaking News

ओमायक्राॅन...!

  ओमायक्राॅन विषाणूचा
  वाढला म्हणे धोका
  शाळा सुरू होईल की नाही
  बाळ घेतो मधे झोका
  कोरोना विषाणू
  सतत बदलतो रुप
  दहशतीत मानव जगतो
  मेला सतावतो आहे खूप
  शासनाची सतर्कता
  आली नवी बंधनं
  जनतेने कसावी कंबर
  परत लावा मास्क बांधनं
  नव्यानं कामाला लागा
  लढाई झाली आहे सुरु
  ओमायक्राॅन येतोय
  आपल्या देशात तुरुतुरु
  एकमेका साहाय्य करू
  धरु परत साथ संगत
  काळजी आपण घेऊ
  बसणार नाही मृत्यूची पंगत
  धाडस आणि हिमतीने
  एकत्रित चला गीत गाऊ
  आलेल्या या संकटाला
  चला दोस्तांनो परतवून लावू
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code