Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

रस्ते मंत्रालयाने लाँच केले नेव्हिगेशन अँप

  नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार रस्त्यावरची लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार रस्ता सुरक्षेच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्याचबरोबर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आयआयटी मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी टंस्रे८कल्ल्िरं सोबत देशातील चालक आणि रस्ता सुरक्षा तंत्रज्ञानासाठी सहकार्य केले आहे. या तिघांनी नागरिकांसाठी मोफत वापरता येण्याजोगे नेव्हिगेशन अँप लाँच केले. हे अँप लोकांना रस्त्यावरच्या अपघातांच्या धोक्यांबद्दल सतर्क करेल. सुरक्षेसंबंधीची इतरही अनेक वैशिष्ट्ये आणि फिचर्स यात आहेत.

  कसे काम करेल अँप?

  नेव्हिगेशन अँप सेवा चालकांना येणारी अपघात प्रवण क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणे आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देईल. हा उपक्रम देशातल्या रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियोजनाचा एक भाग आहे.टंस्रे८कल्ल्िरं ने विकसित केलेल्या टडश्ए नावाच्या या नेव्हिगेशन सेवा अँपने २0२0मध्ये सरकारचे आत्मनिर्भर अँप इनोव्हेशन चॅलेंज जिंकले. या सेवेचा वापर नागरिक आणि अधिकारी अपघात, असुरक्षित क्षेत्र, रस्ता आणि रहदारी समस्या नोंदवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी करू शकतात. आयआयटी मद्रास आणि टंस्रे८कल्ल्िरं द्वारे डेटाचे विेषण केले जाणार आहे, त्यानंतर भविष्यात रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार याचा वापर करेल.

  गेल्या महिन्यात, रस्ते मंत्रालयाने अधिकृतपणे आयआयटी मद्रास इथल्या संशोधकांनी जागतिक बँकेच्या निधीतून तयार केलेले रस्ता सुरक्षा मॉडेल स्वीकारले. ३२ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेच्या विकसित इंटिग्रेटेड रोड अपघात डेटाबेस मॉडेलचा वापर करतील.

  शून्य मृत्यूचे लक्ष्य

  आयआयटी टीमने २0३0पयर्ंत रस्ते अपघातातले मृत्यू ५0 टक्क्यांनी कमी करण्यासाठी रोडमॅप विकसित करण्यात मदत करण्यासाठी विविध राज्य सरकारांशी करार केले आहेत आणि रस्ते वाहतूक अपघातांमध्ये शून्य मृत्यूचे लक्ष्य ठेवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code