अमरावती : जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींच्या 30 प्रभागांतील 32 रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक उद्या, मंगळवारी (21 डिसेंबर) होणार आहे.
अमरावती, अंजनगाव सुर्जी, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार, वरूड, धारणी, चिखलदरा व चांदूर रेल्वे या तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणीला दि. 22 डिसेंबरला संबंधित तहसील कार्यालयांत सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत.
अमरावती तालुक्यातील सावर्डी, इंदला, अंजनगाव बारी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा फासी, जावरा, चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर, चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर व दहिगाव, अचलपूर तालुक्यातील वझ्झर, दर्याबाद, पांढरी, रासेगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवळा बु., लखाड, दर्यापूर तालुक्यातील उपराई, नांदरूण, चिखलदरा तालुक्यातील बिबा, काजळडोह, आवागड, भातकुली तालुक्यातील गणोजा देवी, कवठा बहाळे, वरूड तालुक्यातील काटी, गव्हाणकुंड, झटामझिरी, पुसला, सुरळी, धारणी तालुक्यातील खा-या टेंभरू आदी ग्रामपंचायतींत पोटनिवडणूक होणार आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या