Header Ads Widget

दिल्लीकरांना बुस्टर डोस मिळणार?

    नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉन हळूहळू पाय पसरू लागला असून रुग्णांचा आकडा १७१ वर पोहोचला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्याची मागणी होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे अशी मागणी केली आहे.

    दिल्लीमध्ये ९९ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस आणि ७0 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहे त्यांना बुस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट जास्त घातक नसला तरी तो वेगाने पसरतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी दिल्लीमध्ये आवश्यक तयारी करण्याची गरज आहे, असे म्हणत केजरावाल यांनी लोकांना मास्क घालूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

    दरम्यान, ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी लसीचा बुस्टर डोस रामबाण उपाय आहे का? असा सवाल उपस्थित होत असतानाच केजरीवाल यांनी बुस्टर डोसची मागणी केली. दिल्लीतील ९९ टक्के लोकांना पहिला डोस आणि ७0 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी. यासाठी दिल्लीकडे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरआहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या