मुंबई : अभिनेत्री परिणिती चोप्राचे इन्स्टाग्रावरील फोटो सध्या चर्चेत आहेत. फिल्मफेअर या मासिकासाठी परिणितीने हे फोटोशूट केलेले आहे. काळी साडी आणि काळ्या ड्रेसमधील परिणितीचे मोहक फोटो चाहत्यांना भूरळ पाडत आहेत.
काहींनी परिणितीच्या या फोटोंचा उल्लेख काळी जादू असा केला आहे. फिल्मफेअरनेही कव्हर पेजला कमबॅक क्वीन असे नाव देत, परिणितीची चोप्रा लवकरच धमाक्यात पुनरागमन करेल असा संदेश दिलेला आहे. दोन्ही पोस्ट मिळून जवळपास ९ लाखांवर हार्ट या फोटोंना मिळालेले आहेत. तर काही हजारांत कमेंटही परिणितीला मिळालेले आहेत.
काही वर्षांपूर्वी परिणितीने वजन कमी केले होते. त्यानंतर तिने फीट आणि फाईन फिगरमध्ये फोटो सातत्याने शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनीतील फोटो शेअर केले होते, हेही फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या