Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मानुस

    परतेक मानुस येगळा
    ईचारसरनी त्याची येगळी
    वारे मानसा तुयी हाय
    कहानी येगळी आगळी !!
    नात्यात नातं कोनतबी
    चुलता,सगा,का दोस्त
    मतभेद रायले तरीबी
    नात तोडन्याची करु नगा गोष्ट !!
    बाप असो का पोरगा
    सुन या पोरगी असे
    माय लेक, नवरा बायुको
    झगडा परतेक नात्यात दिसे !!
    व्यक्ती तितक्या परकृती
    काई सोडाच काई धराचं
    गाडी चालवाच लागते
    राग धरुन नाई चालाचं !!
    चुकलं तर समजवाचं
    येकामेकाले घिवून चालाचं
    आमने-सामने बसून
    अंतरंगात डोकावाचं !!
    मानसा मानसात कायले
    राग,लोभ, मत्सर,पाईजेन
    झालं गेलं इसराच,
    थ्याच भूमिकाची ठिवाची ठसन !!
    आयुष्य लय लयान हाय
    हा,हा म्हनता संपून जाईन
    पिरेम कराचं राहून गेलं
    थेच खंत मनात राहीन !!
    मानसा तुच मानसाले
    समजून घ्यायले शिक
    पाऊलो पावली तुले मंग
    भेटत जाईन जगन्याची खरी ट्रिक !!
    हर्षा वाघमारे
    नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code