Header Ads Widget

तूर हमीभावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

    अमरावती : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत नाफेडमार्फत हंगाम 2021-22 मध्ये तूर नोंदणी ऑनलाईन पध्दतीने सुरू असून नोंदणीसाठी जिल्ह्यात एकूण सहा खरेदी केंद्रे निश्चित करुन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्रीमती के. पी. धोपे यांनी केले आहे.

    नोंदणीसाठी खरीप हंगाम 2021-22 मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्यांचे सही-शिक्क्यासह ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड छायाकिंत प्रत तसेच बँक पासबुक प्रत सोबत आणावे. बॅक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट नमुद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुर रेल्वे, दर्यापूर, धारणी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा तसेच अचलपूर येथे खरेदी-विक्री संघामार्फत नोंदणी सुरू आहे.

    तरी केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या