रखरखतं ऊन पडलं
सुगी नव्हती जिवनात
नित्य दुष्काळाने छळलं
शेतक-याचं शेत असं
सावकाराने ढापलं
आयत्या कागदावर
चित्र त्यांने त्याचं काढलं
सर्जकाची ऐशीतैशी
त्यास वा-यावर सोडलं
उभं असतांना घर त्याचं
मग आडं कसं मोडलं
सुपीक होतं शेत तेव्हा
आता तनकटानं व्यापलं
त्यांनी साधला विकास
गाव मात्र भकास जाहलं
पोशींद्याचं पोट खपाटीला
मग त्यांचं कसं फुगलं
काळंबेरं कुणी केलं
सर्व पशू-पक्षांनी विचारलं
ऊठ सुट तडका लावता
वांझ म्हैस गर्भार दाखवता
नाकानं कांदे सोलून
चवथा खांब का नासवता
म्हातारी पडली खाटल्यावर
डाँक्टरांचं औषध नाकारलं
देऊ उदी करू सुदी म्हणून
आम्ही गंगीलेही विणवलं
प्रभातीचा सूर्य घेऊन येवो
उजेड माझ्या दारी
चित्र रेखाटावे समृद्धीचे
माझ्या काळवंडलेल्या उरी
अरुण विघ्ने
0 टिप्पण्या