संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने जागतिक एड्स दिनाच्या पर्वावर विशेष जनजागृती मोहीम राबविली.या अंतर्गत विविध उपक्रम राबविले. माहे डिसेंबर महिन्यात जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात एड्स प्रबोधन,एड्स स्लोगन स्पर्धा,मास्क डिझाईन स्पर्धा तसेच गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.सोबतच पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
एड्स जनजागृती निमित्ताने महाविद्यालयात प्रबोधन कार्यक्रम झाला.यावेळी डॉ.कृष्णकुमार खाकसे,विषय तज्ञ श्री अनिल झाडे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ नरेश इंगळे यांनी केले होते. समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुभाष मुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी प्रा विजय कामडी यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. नरेश इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन कु.प्रनोती राऊत यांनी केले. मोहीमेमध्ये डॉ मेघा सावरकर संतोष नागपुरे प्रा.सुषमा थोटे अमित मेश्राम,ओमप्रकाश इंगोले सह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका तसेच महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या