मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर बायोपिकची तयारी सुरू असून, सर्व काही सुरळीत झाले. तर दिग्दर्शक फराह खान हा बायोपिक दिग्दर्शित करू शकते.
राजेश खन्ना यांच्या जन्मदिनाच्या (२९ डिसेंबर) औचित्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा चित्रपट गौतम चिंतामणी यांचे पुस्तक डार्क स्टार : द लोनलीलेस ऑफ बीईंग राजेश खन्ना, वर आधारित असणार आहे. याबाबत फराह म्हणाली की, मी गौतमचे पुस्तक वाचले आहे, ते जबरदस्त पुस्तक आहे. ती एक रोमांचक कहाणी आहे. सध्या केवळ चर्चा सुरू आहे. त्यामुळे अधिकृत काही सांगू शकत नाही.
या पुस्तकावर चित्रपट बनविण्याचे अधिकार निमार्ता निखिल द्विवेदी यांनी खरेदी केले आहेत. फराहने यापूर्वी 'मै हूँ ना,' 'ओम शांती ओम' हे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान, राजेश खन्नांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये सलग १७ ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले होते. महिला फॅन्समध्ये राजेश खन्नांची क्रेझ जबरदस्त होती. अनेक नायिकेंसोबत त्यांचे नाव जोडले गेले होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या