Recent in Technology

Advertisement

Breaking News

"विद्रोही महात्मा मधील क्रांतिकारी विचारांचे प्रत्येक घरात वाचन झाले पाहिजे " - अँड.दिलीप एडतकर

  * "लेखक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या"विद्रोही महात्मा" या वैचारिक पुस्तकाचे थाटात प्रकाशन"

  अमरावती : "विद्रोही महात्मा मधून प्रा.बनसोड यांनी म.फुलेंच्या क्रांतिकारी पैलुंवर निर्भिडपणे स्पष्ट शब्दात प्रकाश टाकला आहे. त्यातील क्रांतिकारी विचारांचे प्रत्येक घरात वाचन झाले पाहिजे. म.फुलेंच्या विचारानेच भारतीय समाज व देश धर्मांध शक्तिच्या गुलामगिरीतून वाचू शकेल." असे विचार ज्येष्ठ विचारवंत अँड. दिलीप एडतकर यांनी प्रतिपादन केले.

  ते सुधीर प्रकाशन वर्धा व वऱ्हाड विकासच्या वतीने सत्यशोधक , समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित "विद्रोही महात्मा" या महात्मा फुले यांच्या विद्रोही, क्रांतिकारी विचारावर प्रकाश टाकणाऱ्या वैचारिक पु्स्तकाचे प्रकाशन अमरावती येथील जावरकर लाँनच्या सभागृहामध्ये दि.२६ डिसेंबर ,२०२१ ला झाले , याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करीत होते.

  "विद्रोही महात्मा " या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अँड.दिलीप एडतकर ( संपादक,दैनिक विदर्भ मतदार),प्रमुख अतिथी , पुस्तकाचे मुख्य समीक्षक प्रा.अरुण बा. बुंदेले (समाजप्रबोधनकर्ते),मा.सुधीर गवळी(संचालक,सुधीर प्रकाशन, वर्धा), फुले - आंबेडकरी विचारवंत प्रा.डाँ.अशोक चोपडे, सत्यशोधक प्रा.सतीश जामोदकर, डाँ.गणेश खारकर, डाँ. प्रवीण बनसोड, मा.माणिक थुटे ,मा.मिलींद जुनगरे होते. सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. अध्यक्ष व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित " माझ्या अनुभवाचे सार "हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

  याप्रसंगी मुख्य समीक्षक प्रा.अरुण बा.बुंदेले यांनी " महात्मा फुलेंच्या विविधांगी कार्य चळवळींचा इतिहास म्हणजे प्रा .बनसोड यांचे "विद्रोही महात्मा" हे पुस्तक असून परखड विचार, निर्भिड शिकवण,रोखठोक वाणी असा क्रांतिकारी बाणा हे पुस्तक वाचताना येतो. वाचक हे पुस्तक वाचून म.फुलेंच्या क्रांतिकार्याकडे व समग्र वा.डमयाकडे वळतील यात शंका नाही" असे विचार पुस्तकावरील अभ्यासपूर्ण समीक्षण मांडताना व्यक्त केली. लेखक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी," आजची राजकीय व सामाजिक स्थिती पाहता फुले आंबेडकरांच्या अनुयायांनी अन्यायाविरुद्ध सम्यक लढा उभारण्याचे आवाहन केले." प्रकाशक मा.सुधीर गवळी यांनी "फुले- शाहू-आंबेडकरांची पुरोगामी चळवळ गतिशील करण्याची गरज व्यक्त केली व हे कार्य प्रा. बनसोड अविरत करीत असल्याचे सांगितले."

  प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले चँरिटेबल ट्रस्ट,फुले आंबेडकर प्रबोधन मंच, कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान,सर्वशाखीय माळी संघ,अण्णाभऊ साठे क्रांती परिषद,श्री माळी वैभव,संभाजी ब्रिगेड,उपेक्षित समाज महासंघ, मरार माळी बहुउद्देशीय संस्था अाणि फुले ,शाहू,आंबेडकरांच्या अनुयायांनी शाँल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. प्रा.अरुण बुंदेले यांनी प्रा. बनसोड यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वावरील स्वरचितअभंग गायन करून ते त्यांना सस्नेह भेट दिले. प्रा. डाँ.उज्ज्वला सुरेश मेहरे यांनी बहारदार संचालन केले तर कु.मृण्मयी सागर बनसोड ने आभार मानले . संगीत दिग्दर्शक व गायक प्रा.मोहन इंगळे व संच यांनी स्वगत गीत व स्फुर्ती गीतांचे गायन केले.

  याप्रसंगी प्रबोधनकार सौ. वैशाली श्रीधर धाकूलकर, राज्यपुरस्कारप्राप्त श्री प्रदीप लांडे' प्रा.मनोहर ठाकरे ( नेर), इंजि.शरद सिनकर, प्रा. साहेबराव निमकर, अोमप्रकाश अंबाडकर, उद्योजक नंदकिशोर वाठ,डाँ.अस्मिता बनसोड, स्मिता संजय घाटोळ, जयश्री प्रकाश कुबडे, प्रा.गीताताई मडघे, प्राचार्य डाँ.सुरेश पाटील, इंजि.पंकज मोघे, रामलाल खैरे, अनिल भगत ,हभप गोविंद फसाटे,मधुकर आखरे,दिगंबर यावतकर,प्रा.एन. आर .होले, सौ.नंदा बनसोड,पोलीस पाटील कविता नरेंद्र पाचघरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्य क्रमाची सांगता स्वरुची भोजनाने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code