Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

शिवणी रसुलापूर येथे दुर्मिळ प्रजातीचा साप सर्पमित्रांने पकडला

    नांदगाव खंडेश्‍वर : येथून जवळच असलेल्या शिवणी रसुलापूर येथे सर्पमित्र अंकुश ज्ञानेश्‍वरराव कुर्जेकर यांनी अतिशय दुर्मिळ असलेला रेती साप पकडला.

    राजस्थान भागात काही ठिकाणी हा साप निदर्शनास येतो. याबाबत माहिती देताना अंकुर कुर्जेकर म्हणाले, हा साप अतिशय दुर्मिळ असल्यामुळे याला वनविभागाकडे सोपविण्यात येत आहे. वनविभागाशी याबाबत संपर्क झाला असून, त्यांनी हा साप ताब्यात घेण्याचे व वनपरिक्षेत्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. रेती जातीचा हा सर्प तांबूस, तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या खवल्याचे बाहेरच्या बाजूला काळा रंग असतो.

    लांबून पाहिलास त्याचे शरीर जाळीदार दिसते. साप अर्ध विषारी असला तरी,त्याचा दंश घातक ठरू शकतो. शरीराने स्थूल वाटत असलेला हा साप अतिशय चपळ असतो. या सापडला पकडतेवेळी शिवणी येथील त्यांचे सहकारी मोहन गौरखेडे हे देखील त्यांच्या मदतीला उपस्थित होते. अंकुश कुर्जेकर त्यांनी यापूवीर्ही अनेक अत्यंत विषारी व धोकादायक असलेले साप पकडले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code