अमरावती : देशाचे पहिले कृषीमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती २७ डिसेंबर असून ही जयंती आता शासनस्तरावर साजरी होणार आहे याकरिता पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने शासनस्तरावर सतत पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्रातील थोर पुरुषांच्या ज्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या होतात त्यादिवशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालया मार्फत शासकीय जाहिराती देऊन थोर महापुरुषांना आदरांजली कीव्हा श्रद्धांजली वाहिली जाते मात्र स्व. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिनी शासनाकडून राज्यातील कोणत्याही वृत्त्त पत्राना शासकीय जाहिराती दिल्या जात नसल्याने राज्य शासन हे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विषयी उदासीन असल्याचे दिसून येते.शासनाने सर्वच बाबतीत डॉ.देशमुख यांना सापत्य वागणूक दिलेली आहे.
याबाबत अमरावती जिल्ह्यातील कोणतेही लोकप्रतिनिधी ओरडताना दिसत नाहीत आणि त्यांनी आजपर्यंत शासनाला याबाबत साधे एखादे पत्रसुद्धा पाठऊन शासनाच्या निदर्शनात ही बाब आणून दिली नसल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किती जागृत आहेत हे दिसून येते ? जर एखादी मागणी सर्व सामान्य नागरिकाच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली तर हेच लोकप्रतिनिधी आम्हीच ही मागणी पूर्ण केल्याच्या बातम्या वृत्तपत्रात देऊन आपली प्रसिद्धी करून घेतात मग त्यांना ही बाब लक्ष्यात येऊ नये काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे डॉ.देशमुख यांच्या वरील या अन्यायामुळे त्यांच्या अनुयायामध्ये राज्य शासनाविषयी तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे.
त्यामुळे दि. २७ डिसे.रोजी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिनी राज्य सरकारने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यातील सर्वच वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती देऊन डॉ.पंजाबराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करावी अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे तसेच या पत्राच्या प्रतीलीपी माहिती आणि जनसंपर्क मंत्री यांना सुद्धा पाठविल्या आहेत.आणि ही मागणी लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांचेसह राज्य संघटक संदीप बाजड, विदर्भ प्रदेश सदस्य अमोल नानोटकर, डॉ.कुशल लोटे,अमरावती जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख फणींद्र वाडकर अमरावती शहर अध्यक्ष सुधीर गणवीर, यांचेसह सतीश वानखडे,नरेंद्र देशपांडे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या