Header Ads Widget

विद्युत अपघात प्रकरण दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत मिळवून द्यावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

    अमरावती : कठोरा रस्त्यावरील पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटजवळ रंगरंगोटीचे काम सुरू असताना, विद्युतवाहिनीशी संपर्क येऊन काम करणा-या चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांना तत्काळ भरपाई व मदत मिळवून देण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

    पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटजवळ रंगरंगोटीचे काम सुरू होते. त्यादरम्यान तिथे अस्तित्वात असलेल्या विद्युतवाहिनीच्या संपर्कात येऊन रंगरंगोटी करणा-या चौघांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती कळताच तत्काळ दखल घेऊन पालकमंत्र्यांनी महावितरणला चौकशीचेही आदेश दिले आहेत.

    ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत तत्काळ मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने महावितरणतर्फे उपाययोजना हाती घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या