Header Ads Widget

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवा

    मुंबई : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यात रविवारी ३१ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापयर्ंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या ३१ नव्या प्रकरणांपैकी २७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, एक जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा १४१ वर पोहोचला आहे. याचपार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व पालकमंत्र्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

    गेल्या २0 दिवसांत राज्यभरात कोरोनाच्या सक्रीय रुग्ण संख्येत ५0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असं राज्य सरकारनं याआधीच म्हटलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. आज राज्याच्या मंत्रिमडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी निर्देश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या