Header Ads Widget

सारं वावरच निसार झालं !

    वेवस्थेच्या वावरातला कापूस
    काऊन किळकच निंघून रायला
    परिवर्तनाच्या इचारानं फवारलं
    तरी भौ तीभर फरक नाई पळला
    नीरा येकात्तरचा फवारा देला
    तरी तनकट मरून नाई रायलं
    रसायनी खाताचा ढोसई देला
    तरी पीक सुदरून नाई रायलं
    वरतून बोंडं भलकसे हिरवे दिसते
    अंदरून त्याच्यात बोंडअई असते
    कितीक सुधरल्यालं बियानं पेराव
    काई दिसानं त्याले जुनाच रोग घेरते
    सारं वावरच निसार झालं राजेहो
    दुखनं पायाले अन बाम मस्तकाले
    दुखन्यावर औषीदी लावाली पायजे
    पानी कुटीसा मुरते पायलं पायजे
    सारी वेवस्थाच नागरली पायजे
    भुई मुयावर घाव घातला पायजे
    उलथापालथ होईन सा-या मातीची
    तवाच संकरीत बियानं पेरलं पायजे
    -अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या