लातूर : लातूरमध्ये विविध विकासकामांचे उद््घाटन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, लसीकरणाबाबत मोठय़ाप्रमाणावर काम इथे हाती घ्यावे लागेल आणि तसे आम्ही घेऊ, असे पदाधिकार्यांनी देखील मान्य केले आहे.
तसेच, आरटीपीसीआर आणि आरोग्य यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत, उदाहरणादाखल जिल्हाधिकार्यांनी माहिती देताना सांगण्यात आले की, अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभे केलेत. मधल्या काळात राज्य सरकारने सांगितले की दुसरी लाट आली होती त्यावेळी सर्वात जास्त ऑक्सिजन तुम्हाला किती लागला. त्याच्या तिप्पट तुम्ही व्यवस्था करा कारण, तिसर्या लाटेबद्दल किंवा लहान मुलांमध्ये लाट येईल अशा प्रकारची बर्याच चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यात आपण गाफिल राहू नये. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्यांना दिलेल्या होत्या.
तशाप्रकारचे नियोजन इथल्या प्रशासनाने जिल्हाधिकार्यांनी पालकमंत्र्यांनी सगळ्यांनी केलेले आता मला, निदर्शनास आलेले आहे. असेही म्हणाले आहेत. याचबरोबर, लसीकरणाबाबत मोठय़ा प्रमाणावर काम इथे हाती घ्यावे लागेल आणि तसे आम्ही घेऊ, असे पदाधिकार्यांनी देखील मान्य केले. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, साखर कारखाने असतील, कारण इथे मोठय़ा प्रमाणावर साखर कारखाने आहेत त्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे.
याशिवाय इतर देखील ज्या काही सहकारी संस्था असतील, बँकेचे कर्मचारी असतील तेथील लोकांना देखील की हे आपल्या सगळ्याचे काम आहे, असे पटवून देऊन सगळ्यांना सहभागी करून काही सामाजिक संस्थांना सहभागी करून लोकांच्या मनात लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या