Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

हिंगोलीच्या २२ वर्षीय महिलेने दिला तीन बाळांना जन्म

    हिंगोली : एका महिलेने एकाच वेळी दोन बाळांना जन्म देणे ही बाब आता सर्वसामान्य झाली आहे. असे असले तरी हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथील एका महिलेने तीन बाळांना जन्म दिल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये दोन मुले व एका मुलीचा समावेश असून बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे.

    कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथील २२ वर्षीय स्वाती बालाजी काकडे यांना प्रसूतीसाठी नांदेड येथील वाडेकर रुग्णालयात दाखल ७ डिसेंबर मंगळवार रोजी दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री १0 वाजून २१ मिनिटांनी त्यांची प्रसूती झाली. यावेळी त्यांनी तीन बाळांना जन्म दिला. या तिनही चिमुकल्यांच्या जन्म वेळेत अवघ्या एका मिनिटाचे अंतर असून आई आणि तिनही बाळाची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात आले.

    या तीनही बाळांचे वजन अनुक्रमे १ किलो ८00 ग्रॅम, १ किलो ७00, व १ किलो ६00 असे आहे. आई बाळांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाती बालाजी काकडे या महिलेची ही प्रसुतीची पहिलीच वेळ आहे. आईसह सर्व बाळं सुखरुप असल्याने या तीनही चिमुकल्यांच्या पावलांनी काकडे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावातील आणि परिसरातील ही बहुदा पहिलीच घटना असल्याने सदर विषय चांगलाच चर्चिला जात आहे.

    पत्नीला तीन बाळं होतील असे सोनोग्राफीमध्येच कळले होते. तीन बाळ असल्याने सुरुवातीपासूनच गरोदरपणात महिलेची विशेष काळजी घेण्यात येत होती. मात्र तरीही चिंता सतावत होती की, बाळाची आणि आईची प्रकृती प्रसुतीपयर्ंत चांगली रहावी. घरात एकाच वेळी तीन बाळांचे आगमन झाल्याने आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया महिलेचा पती बालाजी काकडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code