अमरावती : डोणगाव जि. बुलढाणा येथील कवी सुनील दौलत खोडके यांच्या काळ नक्कीच नोंद घेईल या त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहाला आर्वी जि वर्धा येथील, दिवंगत देवकाई बनसोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार २०२१' जाहीर झाला आहे.
सुनील खोडके यांच्या कवितासंग्रहाला (काळ नक्कीच नोंद घेईल)परिस प्रकाशन, पुणे विविध दैनिके, मासिके तथा दिवाळी अंकातून सतत प्रसिद्ध होत असतात. २००९ मध्ये त्यांचा 'काव्यपुष्प' हा प्रातिनिधिक कवितासंग्रह सुध्दा प्रसिद्ध झाला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय ते प्रा. जीवन सिंह दिनोरे, प्रा. दत्तात्रेय चेके, विलास अंभोरे, शेषराव धांडे, अरविंद आंबेकर, प्रशांत ढोले, समाधान खिल्लारे,सौ.रत्ना यशवंत मनवरे,प्रकाश जिंदे,प्रकाश बनसोड, संजय ओरकेआणि त्यांच्या पत्नीला देतात. या निमित्ताने त्यांचे साहित्यक्षेत्रातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या