Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2 जानेवारीला

    अमरावती : स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमातंर्गत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन गुगल मिटवर किंवा ऑनलाईन र्व्हच्युअल पद्धतीने सकाळी 8 वाजेपासून करण्यात येत आहे. यामध्ये लोकनृत्य व लोकगीत या दोन बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

    लोकनृत्यासाठी कलाकांराची संख्या साथीदारासह वीसच्या आत असावी. सादरीकरणासाठी वेळेची मर्यादा 15 मिनीटे राहील. लोकगीतासाठी कलाकारांची संख्या सातच्या आत असावी. तसेच सादरीकरणासाठी वेळेची मर्यादा 7 मिनीटे राहील.

    युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे वय हे 15 ते 29 वर्षापर्यंत असावे. स्पर्धकाचा जन्म 12 जानेवारी 1993 ते 12 जानेवारी 2007 या दरम्यानचा असावा. प्रवेश अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने कार्यालयीन वेळेत सादर करावे. आपला संघ, वैय‍क्तिक स्पर्धा याबाबतची नोंदणी या कार्यालयास विहित मुदतीत दिल्यानंतर आपणास स्पर्धेपूर्वी स्पर्धा आयोजनाची ऑनलाईन लिंक व वेळ कळविण्यात येईल. दिलेल्या वेळेवर आपणास किंवा संघास लिंकवर ऑनलाईनव्दारे आपल्या इच्छुक स्थळावरून सादरीकरण करावे लागेल. सहभागी होणाऱ्या स्पर्धकास दिलेल्या निश्चित वेळेतच स्पर्धेत ऑनलाईन उपस्थित राहून कामगिरी किंवा कौशल्य दाखवावे लागेल. सादरीकरणाचे स्पर्धा ऑनलाईन परीक्षणासाठी पंच व निरिक्षक यांच्यामार्फत क्रीडा कार्यालयामध्ये बसून परीक्षण करण्यात येईल. कला सादर करतांना इंटरनेट व विद्युत पुरवठा खंडीत होऊन सादरीकरणास व्यत्यय येणार नाही, याची काळजी स्पर्धकांनी घ्यावी. त्यासाठी शक्य असल्यास स्पर्धकांनी लॅपटॉप व मोबाईलचा वापर करावा. ऑनलाईन सादरीकरण झाल्याबरोबर सादर केलेल्या सादरीकरणाची व्हिडिओ क्लीप कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर amravatidso@gmail.com लगेच पाठवावी. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धेकास किंवा संघाची विभागीय स्तरावर निवड करण्यात येईल.

    प्रवेश अर्ज सादर करतांना संस्था व मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज, विहित नमुन्यातील ओळखपत्र, आधारकार्ड व जन्मतारखेचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षामध्ये राष्ट्रीयस्तरावर सहभागी झालेले युवक-युवती हे युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊ शकत नाही, याची नोंद घ्यावी.

    अधिक माहिती व नियमावलीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे. विहित मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code