Header Ads Widget

शासकीय तंत्रनिकेतन व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाच्या अर्ज विक्रीची मुदत 15 डिसेंबरपर्यंत

    अमरावती : शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिनस्त असलेले अल्प मुदतीचे विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाला यंदापासून सुरवात करण्यात येत आहे.

    व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमामध्ये ई. डब्लू. ॲडव्हॉन्स डिप्लोमा इन एनर्जी मॅनेजमेंट अँड ऑडिट (कालावधी 1 वर्ष) तसेच एफ. एन. डिप्लोमा इन फॅशन आणि टेक्सटाईल डिझाईनिंग (कालावधी 2 वर्ष) यांचा समावेश आहे.

    वरील अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख व रोजगार मिळवून देणारे आहे. ई. डब्लू. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ईलेक्ट्रिकल ऑडिट पॅनल व एनर्जी ऑडिट या व्यावसायिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी संधी उपलब्ध होईल. तसेच अमरावती येथे टेक्सटाईल हब निर्माण झालेले असल्यामुळे एफ. एन. हा अभ्यासक्रम केल्यानंतर रेमंड तसेच सियाराम यासारख्या इतरही वस्त्रोद्योग कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार उपब्लध होऊ शकतो. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जांची विक्री पॉवर लॅब, यंत्र अभियांत्रिकी विभाग शासकीय तंत्रनिकेतन येथे दिनांक 15 डिसेंबर 2021 पर्यंत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मनोज भेंडे (8623828151) यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. मानकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या