Recent in Technology

Advertisement

Breaking News

जिल्ह्यात प्रतिदिवस लसीकरण 12 हजारांवर लसीकरण मोहिमेत टक्का वाढला, धडाडी कायम राखून उद्दिष्ट पूर्ण करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

    अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष मोहिम राबवल्यानंतरही लसीकरणाचा वेग कायम राखण्यात आरोग्य पथकांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात प्रतिदिवस सुमारे 12 हजारहून अधिक व्यक्तीचे लसीकरण होत असून, जिल्ह्यात एकूण 27 लक्ष 40 हजार लसीकरण झाले आहे.

    एकूण लसीकरणात प्रथम मात्रा घेतलेल्या व्यक्तींची संख्या 18 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींची संख्या सव्वानऊ लाखांपर्यंत पोहोचली आहे. दुस-या मात्रेचे लसीकरण वाढविण्यासाठी वेळोवेळी संबंधितांकडे फॉलोअप घेणे व विहित वेळेत लसीकरण पूर्ण आवश्यक आहे. लसीकरणातून आरोग्याचे संरक्षण होते. आपण नववर्षाच्या उंबरठ्यावर असताना निरामय सार्वजनिक आरोग्यासाठी लसीकरणाचे हे कार्य याच धडाडीने पूर्ण करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

    जिल्ह्यातील अनेक गावांत शंभर टक्के लसीकरण झाले आहे. अशा गावांची संख्या वाढली पाहिजे. 31 डिसेंबरपर्यंत पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मोहिमेत ज्या धडाडीने काम केले, तीच धडाडी यापुढेही कायम राखण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code