Header Ads Widget

शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा १0 वा हप्ता १ जानेवारीला

    नवी दिल्ली : शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेंतर्गत मिळणार्‍या दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी २0२१ योजनेचा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याची माहितीही लाभार्थ्यांना पाठवण्यात आली आहे. १ जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकर्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्याच दिवशी दहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे.

    शेतकर्‍यांना पाठवलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २0२२ रोजी दुपारी १२ वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत १0 वा हप्ता जारी करतील. या दिवशी पीएम मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदानही जारी करतील, अशीही माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. शेतकरी दूरदर्शनच्या माध्यमातून या कार्यक्रमात सामील होऊ शकतात. दरम्यान, पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आतापयर्ंत केंद्र सरकारने ११.१७ कोटीहून अधिक शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करते. पहला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३0 नोव्हेंबर दरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जातो.

    पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारने शेतकर्‍यांना आतापयर्ंत ९ हफ्ते दिले आहेत. या योजनेतंर्गत शेतकर्‍यांना २ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दहाव्या हप्त्यासोबतच नवव्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या शेतकर्‍यांनाही दोन हफ्त्याची रक्कम मिळेल. त्यामुळे या शेतकर्‍यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकर्‍यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या