अमरावती : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दिनांक 3 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
हा आदेश कामावरील शासकीय, निम शासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, अत्यंयात्रा, धार्मिक, शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना लागू होणार नाही. अत्यंयात्रेव्यतिरिक्त कोणत्याही मिरवणूकीसाठी पोलिस ठाणे अधिकारी यांची लेखी परवानगी आवश्यक आहे. वरील प्रतिबंधात्मक आदेश शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेसाठी संपूर्ण अमरावती पोलिस आयुक्तयालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात येणार आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी कळविले आहे.