- तिन्ही सांजच्या वेळेला
- युवती मनोहर हिरवाईत
- लाल पोलकं वर हिरवी
- जरतारी सुंदर साडीत.
- लांब काळेभोर कुंतल
- मोकळे रुळे खाद्यांवरी
- तिरछा नजरेच्या बाणा
- सोडते खास सख्यावरी
- शुभ्र दंतपक्तीच्या सुहास्याने
- घायाळ केले मम हृदयाला
- गोर गोमट्या रुपास भुललो
- भावली गं तू माझ्या मनाला.
- शोभे छुमछुम पैंजण रुपेरी
- अनवाणी तुझ्या सुंदर पायात
- हाती घेऊन फांदी उभी तिरकी
- बघताच रुतली तू मम हृदयात.
- शोभा वागळे
- मुंबई