- चुकीच्या क्षणांना
- हलकेच टाळते मी
- चुकीच्या विचारांना
- पुरतेच गाळते मी
- चुकीच्या वाटांना
- वेळीच विसरते मी
- मनाच्या दाहक वेदनेला
- नक्कीच डांबते मी
- निरुत्तर प्रश्नांचे
- पर्याय शोधते मी
- गर्दीत प्रदर्शनांच्या
- नकाबात राहते मी
- स्वार्थाचा संसर्ग होण्याआधीच
- निदान शोधते मी
- संपण्याआधी बरेचदा
- आरंभ शोधते मी
- सौ. शितल राऊत
- अमरावती