- किती काळ आम्ही प्रतीक्षा करावी
- प्रयत्नास त्यांच्या सिमा का नसावी
- कुणी यत्न करतो खातो कुणी मजेने
- विषमता कशाने आता दूर व्हावी
- पिता झाड लावी फळे नातवाला
- श्रमाची महत्ता कुठे त्या कळावी
- तिचे लग्न झाले कुण्या दूर गावा
- इथे माय कष्टी मनाने झुरावी
- नसे पुत्र पोटी तया रोज चिंता
- परी झोपडीला जराही नसावी?
- -सागर प्रकाश
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
- भुजंगप्रयात