• Sun. May 28th, 2023

स्त्री शिक्षणाचे अग्रगन्य कांतीदूत’क्रांतीनायक महात्मा ज्योतिबा फुले होत!आंबेडकरी विचारवंत शिवा प्रधान

    अमरावती : महात्मा ज्योतिबा फुले एक समाजप्रिय न्यायिकतेची भावना ठेवून सामाजिक परिवर्तना बहूमोलाची भूमिका वठविलि ते एक अग्रगन्य समाज सूधारक होत सत्यशोधक भूमिका घेवून त्यांनी त्तत्काळात पेशवे शाहित समाज मन जागविले महाराष्ट्रात स्ञि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे ते एकमेवअग्रगन्य क्रांतीरत्न ज्योतीराव फुले होत’ घरातील स्ञि जर शिकली तर ती मुलांना शिकवेल घर पुढे नेईल समाज पुढे,पर्यायाने राष्ट्र पुढे नेईल आणि शिक्षणाने विकास होईल हा मोलाचा त्यांचा दुरगामी दृष्टीकोन होता. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन गुरू मानले होते, त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले हे एक होत छञपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढून आणि छ.शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम साजरी करणार ज्योतिबा फुले होत, तेव्हापासून शिवजयंती साजरी करन्याची पंरपंरा रूढ झाली ‘क्रातीरत्न ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा मोठी आहे वाचनाचा त्यांना खूप नाद होता त्यांची ग्रथसंपदा आताच्या पिढीने वाचली पाहिजे ज्योतिबांना समजून घेतांना त्यांच्या वाडःमयाचा अभ्यास करणे आजची महत्वाची गरज आहे.

    शिवाजी महाराजा यांचेवरील पोवाडा रचून महाराजा ची यशोगाथा विविध अंगानी केलेली रचना हे एक एतिहासिक सत्य त्यांनी जतन केले आहे, ही साहित्य संपदा सर्वहारा गेली पाहीजे अशा शब्दात क्रांतीविर ज्योतिबा फुले यांचे कार्यगौरव संदर्भात गौरांकित केले. आंबेडकरी विचारवंत,साहित्तिक मा.शिवा प्रधान, यांनी अमरावती मधील बौध्द ऊपासक संघ भिमटेकडी आयेजित संडे मिशनच्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे एकोणचाळीसाव्या स्मृतीदिनानिमित्त महात्मा फुले यांचे जिवन कार्य या विषयावर प्रमूख व्याख्याते म्हणून ते आपले विचार मांडीत होते प्रंसगी कार्यक्रमाचे आंरभी उपासक संघाचे अध्यक्ष मा सेवकदास खोब्रागडे शिवा प्रधान व्याख्याते प्रमुख डि. जि. वानखडे या मान्यवरांनी आदर्शाच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

    या प्रंसगी सूर्यभानजी बनसोड यांनी सामूहिक बुध्द वंदना घेतली.तदनंतर कार्यक्रमाला लाभलेले नियोजित प्रमुख व्याख्याते आंबेडकरी विचारवंत साहितिक मा’ शिवा प्रधान यांचा पुष्प बुके देवून कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवकदास खोब्रागडे यांनीस्वागत केले कार्यक्रमात आयु पुष्पा दंदे उपासिका यांनि एक प्रबोधनपर गित सादर केले संघाचे ऊपासक आयु डि जी वानखडे यांनी बासरीवर छान गित सादर करून ऊपासकांची वाहवा दाद मिळवीली.या कार्यक्रमाच अध्यक्षम्हनून अध्यक्षीय भाषण करतांना मा.सेवकदास खोब्रागडे यांनी सांगितले की महात्मा ज्योतीराव फुले यांनी क्रांतीज्योती साविञी ला शेतामधे सुध्दा मातीवर अक्षरे गिरवून दाखवीली आणि त्यांना शिकविल त्यामूळच साविञी या शिक्षिका,मुख्याध्यापीका झाल्या असे प्रतीपादन केले या कार्यक्रमात ऊपासक श्रिकृष्ण शिरसाठ व मिराताई कडबे यांचा वाढदिवस साजरा करन्यात आला त्यांना पुष्पगुच्छ व पूस्तक देवून संघाचे अध्यक्ष मा.खोब्रागडे याच्या हस्ते भेट देन्यात आली या कार्यक्रमाचे सुञसंचालन ऊपासक संघाचे सचिव आयु प्रभाकर गाडगे यांनी केले.

    सदर कार्यक्रमात आयु साहेबराव गुळसूंदरे’,नलीनी नागदिवे,प्रतिभाताई प्रधान,अनिताताई जंवजाळ, अनिताताई रोडगे, भानुदास प्रधान, राहूल सोमकूवर,सहारे सर, रामकृष्ण तायडे, किशोर तायडे, एन. एम. कांबळे, रंगारी, सुखदेवे, माला चव्हान, मोहोड साहेब, लताताई तायडे, अस्मिता सोमकुवर, मालती मोहोड,सुनिता रायबोले, गवई साहेब, खडसेबाई, चरणदास काळे, ईंगळे, वंदना घरडे, रघूनाथ पाटील, वैभव रायबोले, हिम्मतराव वरघट, मीरा कडबे, विद्याधर जवंजाळ, प्राजक्ता सोमकुवर, आंदिची व सर्व उपासक उपासिका उपस्थिती लक्षणिय होती. या कार्यक्रमाचे आभार दर्शन सहारे सर ऊपासक यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *