सीडीएस बिपीन रावत यांचे अपघातात निधन

    नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या सार्मथ्याला धक्का देणारी बुधवारी घटना घडली आहे. देशाचे पहिले आणि सध्याचे तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथे हा अपघात झाला. सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत अपघातग्रस्त हवाई दलाच्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमध्ये होते.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा, हवालदार सतपाल हे हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला परतत होते. त्यानंतर हवाई दलाचे हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले.

    कॅमल वेलिंग्टन, ऊटी येथे त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे सीडीएस जनरल बिपीन रावत व्याख्यान देऊन परतत असताना अपघात झाला. कॅमल वेलिंग्टनमध्ये सशस्त्र दलाचे महाविद्यालय आहे. सीडीएस यांना घेऊन जाणारे विमान किंवा हेलिकॉप्टर उडवण्यासाठी एक विशेष प्रोटोकॉल आहे.

    बिपिन रावत यांनी १ जानेवारी २0२0 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद स्वीकारले. याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. रावत यांनी ३१ डिसेंबर २0१६ ते ३१ डिसेंबर २0१९ पयर्ंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. बिपिन रावत यांना लष्करातील अत्युच्च कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवापदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक तसेच विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.