वेवस्थेच्या वावरातला कापूस काऊन किळकच निंघून रायला परिवर्तनाच्या इचारानं फवारलं तरी भौ तीभर फरक नाई पळला नीरा येकात्तरचा फवारा देला तरी तनकट मरून नाई रायलं रसायनी खाताचा ढोसई देला तरी पीक सुदरून नाई रायलं वरतून बोंडं भलकसे हिरवे दिसते अंदरून त्याच्यात बोंडअई असते कितीक सुधरल्यालं बियानं पेराव काई दिसानं त्याले जुनाच रोग घेरते सारं वावरच निसार झालं राजेहो दुखनं पायाले अन बाम मस्तकाले दुखन्यावर औषीदी लावाली पायजे पानी कुटीसा मुरते पायलं पायजे सारी वेवस्थाच नागरली पायजे भुई मुयावर घाव घातला पायजे उलथापालथ होईन सा-या मातीची तवाच संकरीत बियानं पेरलं पायजे -अरुण विघ्ने Post Views: 3Share this: Contents hide 1 Share this: 2 Like this: TwitterFacebookLike this:Like Loading... Post navigationगझल वांझ म्हैस गर्भार दाखवता
काटेरी वाट तरीही उंच भरारी, वेध साहित्यिकांचा : श्रीराम चव्हाण Jun 1, 2023 gauravprakashan1@gmail.com