समाज सेवक

    समाज सेवक । सेवेचा वाहक ।
    प्रेरणा कारक । जगताचा ।।
    अंगी सेवा भाव । कृती युक्त गाव ।
    घेती सारे नाव । कर्मामुळे ।।
    जनहिता पुढे । सोडवितो कोडे ।
    योग्य तेचि धडे । देई लोकां ।।
    सेवेचाच ध्यास । गुण शोभे खास।
    सेवारूपी दास । या सृष्टीचा ।।
    सेवेसाठी जगे । आदर्शाने वागे ।
    नच पाही मागे । कदापिही ।।
    सकल कल्याणा।राबतो हा राणा।
    त्याग कार्य जाणा । सर्वजण ।।
    लोभ,स्वार्थ सोडी। लावी सेवा गोडी ।
    उंची नाही थोडी । सेवकांची।।
    मनुष्यच तोही । अन्य काही नाही।
    कीर्ती दिशा दाही । परी त्याची।।
    सेवेची कदर । करावा आदर ।
    शब्दांची चादर । युवा वाही ।।
    -युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता : बार्शी
    जिल्हा: सोलापूर
    8275171227