अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा (महाउर्जा) सोळावा राज्यस्तरीय २0२0/२१ चा उर्जा संवर्धन पुरस्कार घोषित झाला आहे. विद्यापीठ स्तरामध्ये द्वितीय क्रमांक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधून एकमेव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला उर्जा संवर्धन पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणचे महासंचालक यांनी उर्जा संवर्धन पुरस्काराची घोषणा केली, त्यामध्ये विद्यापीठ गटात प्रथम पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या विद्यापीठाला, तर द्वितीय पुरस्कार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला घोषित झाला आहे. विद्यापीठाने वर्ष २0१८ मध्ये विद्यापीठातील सात इमारतींवर ५७६ के.डब्ल्यु.पी. इतक्या क्षमतेच्या स्थापित केलेल्या सौर उर्जा प्रकल्पातुन प्रतिवर्ष ८,0८३८६युनीट विज निमीर्ती होत असुन त्यातून दरवर्षी ५0.00 लक्ष रुपए विज देयकाची बचत होत आहे.
विद्यापीठाने अत्याधुनिक विज उपकरणांसह फाईव्ह स्टार रेटींग, ए.सी, बी.एल.डी.सी. फॅन, विद्युत दिवे आदी वापरण्यास सुरूवात केली असून जवळपास पन्नास टक्के उपकरणे फाईव्ह स्टार रेटींग असलेल्या उपकरणांमध्ये बदलविली आहेत.विद्यापीठाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात सुद्दा उत्तुंग भरारी घेतली आहे. परिसरात २00,६0,१0 फुट आकाराचे ५0 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे दोन मोठे शेततळे निर्णाण केलेले असुन परिसराबाहेर वाहुन जाणारे पावसाचे पाणी परिसरात अडवून मुरविण्यात येते.
विद्यापीठातील सर्व मोठज इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे जलव्यवस्थापन करण्यात येत असुन विद्यापीठात सहा मोठे शेततळे व दोन मोठज जलतलावांची निर्मिती यापूर्वीच करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर आदी योजनां लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. विद्यापीठास उर्जा संवर्धन, जलव्यवस्थापन इ. कामांकरीता केंद्र शासन, सेसी, रूसा, मेडा, महाराष्ट्र शासनाकडुन अनुदान प्राप्त झाले असुन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही ह्रा कामांकरीता विद्यापीठ निधीतुन निधी उपलब्ध करुन दिला आहे.