• Sun. May 28th, 2023

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

    * विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा -प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे

      अमरावती : समाजकल्याण विभागाच्या सर्व शासकीय वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २० डिसेंबर व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

      बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हा मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी दिली.

      ते म्हणाले सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालयांचे ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्याची आवश्यकता नव्हती. आता चालू शैक्षणिक सत्र प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू होत असल्याने मागील वर्षाचे व चालू वर्षाचे असे सरसकट दोन वर्षांचे प्रवेश देण्यात येत आहेत.

      योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांहून अधिक नसावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश देण्यात येईल.

      शालेय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेशासाठी इयत्ता दहावी व अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून), बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. अशा अभ्यासक्रमात प्रवेशित पदविका, पदवी आणि एम. ए., एम. कॉम, एम. एस्सी. असे पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. २० डिसेंबरपर्यंत संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत वसतिगृहात अर्ज सादर करावेत.

      अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. आयुक्तांनी दिलेल्या या मुदतवाढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *