- विसरले सगळे पण मला
- अजूनही आठवतो
- तो वडिलांचं दुःखद दिवस,
- ती काळ रात्र, ती वेळ,
- मायेचा हृद्याला फुटलेला
- पाझर,
- आईचा अखेरचा श्वास..
- विसरले सगळे पण मला अजूनही आठवते…!
- त्यांचा लहानपणीचा
- हळवा स्पर्श,त्यांनी केलेलं संगोपन…
- त्यांचे आतुरलेपणा,
- माझ्या नजरेतला त्यांनी
- बघितलेले स्वप्न,
- त्यांनी केलेली मेहनत,
- पराकाष्ठा, त्यांचे हर्ष.
- विसरले सगळे पण मला अजुनही आठवते….
- त्यांच्या हळुवार मिठीपुढे
- तेव्हा ते वाटलं सोनेरी क्षण
- आता ते सगळे संदर्भ
- मला नेहमी त्रस्त करतात.
- बालपणीच्या विश्वात घेऊन जातात..
- आता थोड त्यांना विसरायला
- हवे.त्यांच्या आठवणीपासून
- जगण्यास थोड प्रयत्न
- करायला हवेत.
- पण ……
- मन माझ कुठ ऐकतं
- जेवढं विसरण्याचा प्रयत्न
- करतो तेवढीच त्यांची स्मृती
- माझ्या डोळ्यापुढे उभी राहते
- आठवणी ला उजाळा देऊन जाते
- विसरले सगळे पण मला अजूनही आठवते…..!
- -सुरेश बा.राठोड
- (कलाशिक्षक)
- मूळगाव. उमरी ई.(आर्णी)
- राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर.
- जि. नागपूर.
9765950144
Contents hide