विकास कामांची पूर्तता करतांना सर्वसामान्य जनतेची साथ मोलाची-आ. सौ. सुलभाताई खोडके

  शिवार्पण कॉलनी- विश्वप्रभा कॉलनीत ३०.५२ लक्ष निधीतून मूलभूत सुविधांची विकास कामे

  अमरावती ०९ डिसेंबर : मूलभूत सोई सुविधांच्या विकास कामांसाठीच्या विशेष अनुदानातील ३०.५२ लक्ष निधीतून शेगांव परिसरात विकास कामे मार्गी लागत आहे. या अंतर्गत २३.३२ लक्ष निधीतून देशमुख लॉन मागील शिवार्पण कॉलनी येथे नालींचे बांधकाम करण्यात आले आहे. आ. सुलभाताई खोडके यांनी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली. तसेच विश्वप्रभा कॉलोनी शेगाव परिसर येथे ७.२० लक्ष निधीतून रस्ता बांधकाम करण्यात येत आले.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  याचे भूमिपूजन देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागात विकास कामांची पूर्तता केल्या बद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचे स्वागत करण्यासह आभार मानीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . सर्वसामान्य जनतेचा विश्वास व पाठबळामुळे नेहमीची मतदार संघात काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. मूलभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण तसेच सर्वांगीण विकास कामांची पूर्तता करीत असतांना सर्व सामान्य जनतेची साथ मोलाची ठरू पाहत आहे. विकासाची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असून जनतेने हाच विश्वास व साथ कायम ठेवावी असे, मनोगत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केले.

  तामिलनाडु मधील निलगीरीच्या जंगलात वायू सेना दलाचे विमान कोसळले , या भीषण अपघातात देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेंस स्टाफ (सिडीएस) जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी व इतर अधिका-यांसह एकुण १३ जण मृत्युमुखी पडले. या वेळी शोकसंवेदना व्यक्त करीत जनरल बिपिन रावत यांना व भारतीय सैन्य दलाचे सर्व विर शहीद जवानांना आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत सर्व उपस्थितांच्या वतीने माैन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

  यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत नगरसेवक – प्रशांत डवरे, माजी नगरसेविका – अर्चना इंगोले, प्रविण मेश्राम, रविंद्र इंगोले, ऍड . सुनिल बोळे, प्रमोद सांगोले, रत्नदिप बागडे, यश खोडके, प्रशांत उर्फ गुड्डु धर्माळे, निलेश शर्मा, दिपक कोरपे, प्रशांत पेठे, भागवत उर्फ बंडु निंभोरकर, प्रमोद महल्ले, योगेश सवाई, बबलु वाडेकर, दत्तात्रय बागल, अभिलाष नरोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे – शाखा अभियंता – महादेव मानकर, शाखा अभियंता – अनिल भटकर, मनपा अभियंता – अंकुर डवरे, प्रा. डब्ल्यु. पि. वर्धे, नरेश मोंढे, संदिप सोनोने, निलेश तायडे, आर.एल. तसरे, गजानन पवार, सिध्दार्थ इंगळे, प्रभुदास वानखडे, राजुभाऊ मकेश्वर, अविनाश ठोसरे, विनायक नरोडे, संजय कोहाड, कैलास नाईक, रमेश तेलमोरे, गजानन काळे, अर्जुन वानखडे, रविंद्र शिरसाट, सुभाष शिले, विनोद मावळे, प्रशांत चौधरी, अंकुश कडु, मधुकर मडघे, राहुल वाटाणे, विलास तेलखडे, राजेंद्र आसोलकर, दिपक चंदन, रामेश्वर नागपुरकर, यादव, सुनिल जयस्वाल, अतुल फालके, मुकुंदराव ठाकरे, रामदास साबळे, दिनेश दापुरकर, सुशांत दरेकर, प्रज्वल बोबडे, सचिन माथने, प्रा. विशाल जाधव, राहुल वाटाणे, आर.पी. नागपुरकर, सौ. संगिता सिरसाट, विश्वजा वानखडे, मेघना इंगळे, अलका डिहीए, सिंधु वर्धे, संध्या तसरे, शिला गारोडे, वर्षा गवई, सुनिता वानखडे, सुजाता सोनुल, नेहा मोंढे, सुनंदा तायडे, सुलभा तायडे, सुनंदा वानखडे, अरुणा माहुरे, नेहा मोंढे, कांचन काळे, सुनंदा तायडे वैशाली मोहोड, वंदना मकेश्वर, सुभांगी खाकसे, सुनंदा तेलमोरे, कविता चव्हाण, माधुरी मावळे, विना चौधरी, कविता फालके, काजल यादव, अश्विनी पिंजरकर, ललिता जयस्वाल, राणी जयस्वाल, संगिता जाधव, वैशाली साबळे, नंदा इंगोले, अर्चना कातळे, प्रियंका नागपुरकर, माया वाटाणे, छाया दरेकर, रुख्मिणी पिंजरकर, सुरेखा मातणे, दिपा पाटील, चित्रा बोबळे, सुषमा दरेकर, आदी सहीत विश्वप्रभा काॅलनी – शिवार्पण काॅलनी येथे जेष्ठ नागरीक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.