- * दर्यापूर एसडीओ आवाहन
दर्यापूर: दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील समस्त नागरिकांना याद्वारे जाहिर आवाहन करण्यात येते की, कोरोना विषाणुच्या प्रकारापैकी असलेला ओमीक्रॉन चा मागील काही दिवसांपासून जगामध्ये झपाटयाने प्रसार होत असल्याचे आढळुन आले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना-19 विषाणुच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
तसेच दि.31/12/2021 ते दि.15/01/2022 पर्यंत कोवीड-19 ची दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून सदर ड्रॉ मधील पहिल्या 10 नागरिकांना मा.जिल्हाधिकारी, अमरावती कार्यालयामार्फत आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.
तरी कोवीड-19 च्या दुसऱ्या डोजकरीता आवश्यक कालावधी पुर्ण होऊनही लस न घेतलेल्या दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या गावाजवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन दि.31/12/2021 ते दि.15/01/2022 पर्यंत दुसरी लस घेण्याबाबत याद्वारे समस्त जनतेस आवाहन करण्यात येत आहे.